nude-sleep1
अंगावर
कपडे न घालता झोपणं, म्हणजेच नग्न झोपणं आपल्या शारीरिक आणि मानसिक
आरोग्यासाठी हितकारक ठरू शकतं, हे वाचून थोडं आश्चर्य वाटणं स्वाभाविकच
आहे. पण, नग्न झोपणं खूप लाभदायक असल्याचा दावा बड्या अभ्यासकांनी,
जाणकारांनीही केला आहे.
nude-sleep2
पुरुष असो वा स्त्री, वृद्ध असो वा तरुण-तरुणी किंवा लहान मुलं... सगळ्यांसाठी विवस्त्र झोपण्याचे एक-दोन नव्हे तर अनेक फायदे आहेत.
nude-sleep3
सगळे
कपडे काढून झोपण्याची कल्पना बऱ्याच जणांना विचित्रच वाटेल. लहानपणापासून
आपल्याला तशी सवयच नसते. पण नग्न झोपण्याचा अनुभव खूप सुखावह ठरू शकतो.
nude-sleep4
चांगल्या
आरोग्यासाठी सगळे कपडे घालून झोपण्याची सवय बदलण्याचा प्रयत्न आपण केला
पाहिजे. अर्थातच, हे लगेच जमणार नाही. म्हणूनच, सुरुवातीला फक्त
अंतर्वस्त्रं घालून झोपण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला शरीरशास्त्रज्ञ
देतात.
nude-sleep5
काही
दिवस अंतर्वस्त्रांवरच झोपल्यानंतर हळूहळू पूर्ण विवस्त्र झोपण्याची तुमची
मानसिक तयारी होईल आणि त्यानंतर त्याचे फायदेही तुम्हाला कळू शकतील.
nude-sleep6
नग्न झोपण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, त्यातून मिळणारा आरामदायी अनुभव.
nude-sleep7
ऑफिसमधून
आल्यानंतर आपण थोडे सुटसुटीत, ढगळे कपडे घालतो. त्यामुळे आपल्याला फ्रेश
झाल्यासारखं वाटतं. झोपही शांत लागते. पण पूर्ण विवस्त्र झोपल्यानं काही
मिनिटांतच दिवसभराचा सगळा थकवा पळून जातो आणि निवांत झोप लागते.
nude-sleep8
आपण
जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. अशावेळी
अंगावरचे कपडे किंवा पांघरूण आपल्याला ऊब देतं. पण ही झोप 'चैन की निंद'
नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
nude-sleep9
शरीराचं
तापमान कमी होणं हे सुखाच्या झोपेचं लक्षण मानलं जातं. पण कपडे घालून आपण
नेमकं तेच होऊ देत नाही. उलट, विवस्त्र राहून खोलीतील गारवा अनुभवत घेतलेली
झोप आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.
nude-sleep10
विवस्त्र
झोपण्याचा फायदा शरीरातील संप्रेरकांनाही (हार्मोन्स) मिळतो. शरीराचं कमी
झालेलं तापमान हार्मोन्सच्या विकासासाठी लाभदायक ठरतं. त्यातून आपल्याला
नितळ त्वचा मिळू शकते, केसांची वाढ होऊ शकते.
nude-sleep11
म्हणजेच विवस्त्र झोपण्यानं आपलं सौंदर्य खुलू शकतं. पती-पत्नींसाठी तर विवस्त्र झोपणं बऱ्याच अर्थानं फायद्याचं आहे.
No comments:
Post a Comment